वेगवान नाशिक
नवी दिल्लीः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला असून दोन्ही राज्यातील वातावरण तापलं आहे. याप्रकरणी संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी केंद्र सरकारकला निर्वाणीचा इशारा दिला आहे. बेळगावसह सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. नाहीतर महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील, असा इशारा दिला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते
तसेच गेल्या २४ तासांपासून सीमाभागात सरकारी प्रेरणेने वाहनांची तोडफोड, हल्ले होत आहेत. आणि प्रतिकार करणाऱ्यां महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या घरात घुसून तुरुंगात डांबलं जात आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही. अशाप्रकारची वेळ महाराष्ट्रावर आली नव्हती. एवढं हतबल सरकार आणि हतबल मुख्यमंत्री मी आतापर्यंत पाहिला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
एलआयसीच्या या तीन योजना गुंतवणूकदारांना देतेय जबरदस्त परतावा
त्यानंतर राऊत म्हणाले, केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊच शकत नाही. नाहीतर महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं सरकार गेलं खड्ड्यात, असा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात? डरपोक सरकार आहे. यांना आपल्या महाराष्ट्रतील जनतेची, सीमांची काळजी नाही.या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत संजय राऊत आक्रमक झाले आहे.
या बॅंकेच्या रेपो व्याज दरात एवढ्या टक्कयांनी वाढ, तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम