वेगवान नाशिक
दिल्लीः गेल्या दोन महिन्यांनंतर RBI ने पुन्हा एकदा आपल्या रेपो व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार असून तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना मित्र आणि नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते
नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 टक्क्यांनी बीपीएसची वाढ सांगितली आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू होती. त्यांच्या या मीटिंगचा एजेंडा हा महागाई रोखण्याचाच होता. त्यामुळे यासाठी आरबीआयकडून कठोर पाऊलं उचलली जातील असे संकेत शक्तिकांत दास यांनी दिले होते.
10वी पाससाठी नोकरीच्या संधी, नौदलात विविध पदांसाठी एवढ्या जागांवर भरती
या वर्षीच्या जानेवारीपासून महागाईचा दर 6 टक्क्यांहून अधिक आहे. हा दर समाधानकारक पातळीच्याही वर आहे. त्यामुळे हा दर कमी करण्याचा प्रयत्न आरबीआयकडून केले जाणार आहेत. सध्या व्याजदर 35 बीपीएस म्हणजे 0.35 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
म्हणुनच तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागणार असून होम लोनपासून ते ऑटो आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महाग होईल.
तसेच रेपो रेटच्या आधारावर आरबीआय बँकांना कर्ज देत असते. त्यानंतर बँका हे कर्ज ग्राहकांना देत असतात.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यावर्षी खत अनुदान एवढ्या लाख कोटीपर्यंत होऊ शकते वाढ