वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव-
मनमाड येथे दि.9.12.2022 ते 11.12.2022 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने आमदार सुहास कांदे यांच्या निधीतून व माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या सहकार्याने 70व्या आमदार चषक प्रौढ गट महिला व पुरुष नाशिक जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धा संपन्न होणार आहेत.जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू व कबड्डी प्रेमी नागरिकांना ही मेजवानी ठरणार आहे.
या स्पर्धेत 44 पुरुष व 14 महिला संघ सहभाग घेण्याची शक्यता आहे.स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 9.12.2022 रोजी सकाळी 11 वा.मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे तर बक्षिस समारंभ 11.12.2022 रोजी सायंकाळी ठिक 7 वा.क्रीडांगणावर होणार आहे.
या स्पर्धेतून राज्य निवड चाचणी स्पर्धेकरीता नाशिक जिल्हयाचे पुरुष व महिला संघ निवडले जाणार आहेत.निवड झालेल्या खेळाडूंना 15 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत नाशिक येथे मॅटवर सराव शिबीर घेतले जाणार आहे.तेथे 22 खेळाडूंची निवड करून त्यातल्या 12 खेळाडूंची अंतिम निवड करण्यात येणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आमदार सुहास कांदे,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जाधव,संस्थेचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सर्वश्री रहेमान शेख,राजू डमरे,वाल्मिक बागूल,विलास मोरे,सुधाकर कातकडे,शाकीर शेख,सतिश सुर्यवंशी, सुधाकर काळे,राजेश निकुंभ,शेखर आहिरे आदी स्पर्धेची पूर्वतयारी करीत आहेत.