Nashik महापालिकेच्या जनतेवर करवाढीचे संकट


वेगवान नाशिक

नाशिक : आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक मांडले जाणार आहेत. त्यात जवळपास ४०० कोटी रुपयांची तूट उत्पन्नात दिसून येत असून ती भरून काढण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी वगळता अन्य करांचे सुलभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज

तसेच  करांचे दर शुल्क व दंड यात सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या जनतेवर करवाढीचे संकट येणार आहे. असे असून देखील राजकीय पक्षाकडून करवाढ विरोधात रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता या महिन्यापासून होण्याची शक्यता

दरम्यान महसुलाच्या तुटीतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांच्या माध्यमातून लावले जाणारे दंड व कर यामध्ये सुधारणा अर्थात वाढ करण्याचे संकेत आहे. याबाबत  मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी आवश्यक असेल तिथे कर वाढ व शुल्कासह दंड वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तर करवाढ लागू करताना औद्योगिक वसाहतीमधील मिळकतींवरदेखील चारपट कर लागू केल्याने कंपन्या वाढत्या कराच्या बोजामुळे टाळे ठोकत आहे. त्यामुळे इतर कर व दंडाच्या रकमेत वाढ करताना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

Share Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *