मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका


वेगवान नाशिक

मुंबईः राज्यात सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. त्यात बेळगाव दौ-यावरून आता सीमावाद चिघळणार असल्याचं चित्र आहे. अशातच कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात न येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांचे दौरे स्थगित केले आहेत. यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीचे नेत्यांकडून टीका केली जात आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज

यामध्ये  सुप्रिया सुळे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहत त्यात त्यांनी शरद पवार आणि एस. एम. जोशी यांनी ऐंशीच्या दशकातील दिलेल्या लढ्याची आठवण सांगितली असून शिंदे फडणवीस सरकारवर टीकाही केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, साहेबांनी कर्नाटक पोलीसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते.  सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला.

Share Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला

तसेच साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय, असं म्हणत सरकारला टोला लगावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखांबाबत मुनगंटीवार यांची मोठी घोषणा


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *