वेगवान नाशिक
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावीखोर विधान बोलली जात आहे. त्यामुळे आता सीमावादावर भूमिका घेण्याची वेळ आली असून येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज
दरम्यान कर्नाटकच्या बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखांबाबत मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
ते म्हणाले, देशाला ज्यांनी संविधान दिलं. थोर महात्म्याच्या स्मरणाच्या दिवशी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण काही आठवड्यापासून एका वेगळ्याच स्वरुपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आहे. आज महाराष्ट्रातील ट्रकची तोडफोड केली गेली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वक्तव्य देशाच्या ऐक्याला धोका देणारी आहे. पण महाराष्ट्रानं संयम पाळला पण त्यालाही मर्यादा असतात.
त्यामुळे सीमावाद सोडवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होत नसतील तर पुढे जाऊन कुणी कायदा हातात घेतला तर त्याच्या परिणामांची जबाबदारी सरकारची असेल. केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही”, असा स्पष्ट शब्दांत शरद पवार यांनी दोन्ही राज्यांच्या सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता या महिन्यापासून होण्याची शक्यता