नाशिकः किरकोळ भांडणाच्या कारणावरून मारहाण, एकजण जखमी


वेगवान नाशिक

नाशिकः  नाशिकरोड परिसरात किरकोळ भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी एकाच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज

याबाबत माहिती अशी की, चेतन सुनील रिपोटे (रा.राजवाडा, देवळाली गाव, नाशिकरोड) या युवकाने तक्रार दाखल केली असून त्यात म्हटले की, मालधक्का रोडवर उभा असताना अचानकपणे निखील भालेराव, प्रकाश शामराव भालेराव व समीर शेख हे तिघे जण आले. त्यानंतर किरकोळ भांडणाच्या कारणावरून डोक्यात वीट मारून जखमी करत पळून गेले.

 याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ढगे करत आहेत.

रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! शिधापत्रिकेद्वारे मिळणार अधिक रेशन


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *