नाशिकः महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता १७ हजारांची लाच घेताना एसीबीच्या ताब्यात


वेगवान नाशिक

नाशिक : गेल्या काही महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांना मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. तर काही दिवसांपासून हे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र पुन्हा एकदा एसीबीने धडक कारवाया करण्यास सुरुवात केली असून वीज वितरण महामंडळाच्या अधिकार्‍याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुति घालपे यांस १७ हजारची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारास त्याच्या व्यवसायाकरिता वापरात असलेल्या वीज कनेक्शन मीटरचे 15 एचपी वरून ४० एचपी लोड वाढवून देण्याच्या मोबदल्यात संशयित संजय मारूती घालपे (34), व्यवसाय – खाजगी ठेकेदार, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी. जिल्हा. अहमदनगर. याने आपल्या वैयक्तिक ओळखीचा फायदा घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीज कनेक्शन भार वाढवून देण्याच्या मोबदल्यात १ लाख २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असून त्यापैकी निम्मी रक्कम १७ हजार रुपये काम सुरू करण्यापूर्वी मागितले.

महाराष्ट्राच्या विकासासाठी नवीन उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण आणले जाणार- देवेंद्र फडणवीस

त्यानंतर पंच साक्षीदारांच्या समक्ष ५१ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पठारे याला रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीने ५१ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली असून या प्रकरणी संशयितावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी  पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागानेही पडताळणी करत सापळा रचत घालपे याला १७ हजारची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

Share Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला

 

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *