छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखांबाबत मुनगंटीवार यांची मोठी घोषणा


वेगवान नाशिक

सध्या येणा-या २०२४ वर्षात शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज

तसेच या कार्यक्रमापर्यंत जगदंबा तलवार ब्रिटनने दिली, तर हा आनंदोत्सव आणखी उत्साहात साजरा होईल, असे मुनगंटीवार म्हणाले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजा यांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याबाबत तशी मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

Share Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला

दरम्यान ब्रिटनमध्ये असलेली जगदंबा तलवार परत यावी. ज्या दगलबाज अफजलखानाने पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला महाराष्ट्रीय बाणा दाखवला आणि त्याचे पोट ज्या वाघनखांनी फाडले ती वाघनखंदेखील ब्रिटनमध्ये आहेत. म्हणूनच  ते शिवराज्याभिषेकदिनापर्यंत महाराष्ट्रात यावीत असा आमचा प्रयत्न असल्याची  माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

याबाबत  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यामध्ये विशेष लक्ष द्यावे अशी विनंती केली असून आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना किती यश मिळेल हे मी आताच सांगू शकत नाही, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहे.

सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ, अधिक किंमत लागेल मोजावी

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *