Nashik शहरात मांजाने गळा कापल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी


वेगवान नाशिक

सातपूर : शहरातील सातपूर परिसरात एका दुचाकीस्वाराचा नायलॉन मांजाने गळा चिरून जखमी झाल्याची घटना दि. ५ रोजी सांयकाळच्या सुमारास घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे शहरात पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याची मागणी होते आहे.

याबाबत माहिती अशी की, सातपूर परिसरातील प्रवीण महादू वाघ रा. महादेव नगर हे कामानिमित्त आपल्या दुचाकीने सातपूर खोका मार्केटला परिसरात गेले होते. त्यावेळी ते दुचाकी चालवत असताना अचानक त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजाचा विळखा पडला, त्यानंतर त्यांना गाडी थांबवेपर्यंत मांजा घासून गळ्याला गंभीर जखम झाली होती.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज

याबाबत बाजूच्या नागरिकांना लक्षात येताच त्यांनी धाव घेत वाघ यांना मदत करत तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु जखम जास्त खोल असल्याने वाघ यांना आठ टाके पडले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितल जात आहे. मात्र गळा कापल्याचे लक्षात येताच घटनास्थळी पतंग उडविणार्‍या मुलाने नॉयलॉन मांज्याची फिरकी तशीच टाकून पळ काढला आहे.

दरम्यान शहरात  पूर्णपणे बंदी असूनही घातक मांजाची निर्मिती, विक्री व वापर होत असेल तर कायद्याचा धाक कमी पडल्याचेच हे चित्र असल्यामुळे पोलिसांनी आता अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ, अधिक किंमत लागेल मोजावी

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *