वेगवान नेटवर्क
गेल्या काही महिन्यात अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. त्यात मंदीचा हवाला देत जगभरातील मोठ्या कंपन्या त्यांचे कर्मचारी कमी करताना सतत टाळेबंदी करत आहेत. अशातच आता यामध्ये आणखी एका मोठ्या कंपनीचे नाव जोडले जाणार असून पेप्सिको इंक, कोल्ड्रिंक्स आणि चिप्स बनवणाऱ्या कंपनीने आपल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनीने अलीकडेच मोठ्या टाळेबंदीचे संकेत दिले असून या काळात कंपनी शेकडो कर्मचाऱ्यांना घरी बसवू शकते.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज
दरम्यान या कंपनीने टाळेबंदीचे उद्दीष्ट संस्था सुलभ करणे आहे जेणेकरून आम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करू शकू, असे कर्मचार्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये, पेप्सिकोने कर्मचार्यांना सांगितले. याशिवाय शीतपेय व्यवसायातील कपात खूप मोठी असेल कारण स्नॅक्स युनिटने आधीच स्वैच्छिक सेवानिवृत्ती कार्यक्रमासह टाळेबंदी केली आहे.
Share Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला
त्यात पेप्सिको कंपनी आपल्या न्यूयॉर्क मुख्य कार्यालयातील स्नॅक आणि शीतपेये युनिटशी संबंधित १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. मात्र, पेप्सिकोच्या प्रवक्त्याने अद्याप कपातीबाबत कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. तर पेप्सिकोच्या टाळेबंदीमुळे कंपनीच्या शीतपेय युनिटवर परिणाम होईल असे म्हटले जाते.
सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ, अधिक किंमत लागेल मोजावी