दुःखीत कुटुंबाची घेतली सपत्नीक भेट,आमदारांचे सर्व प्रकाराच्या सहकार्याचे आश्वासन


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव-

आमदार सुहास कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांनी एकलव्य नगर येथील सोनवणे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व 1 लाख रुपये रोख मदत आणि चार महिने पुरेल इतका धान्य व किराणा मदत दिली.

मनमाड येथील एकलव्य नगर येथील रहिवासी लोकेश सुनील सोनवणे या बालकाचा निर्घृण खून झाला होता.अतिशय हृदयद्रावक अशा घटनेची माहिती मिळताच सौ.अंजुमताई कांदे यांनी तात्काळ या कुटुंबाला भेट दिली आणि योग्य तपासाकरिता पोलिसांना सूचना देखील दिल्या होत्या.दोन तासातच पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीस अटक केलेली असून पुढील कारवाई सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेतली.घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त करत आपण सदर घटना विशेष केस म्हणून फास्टट्रॅक मार्फत चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.सोबतच उज्वल निकम सारख्या दर्जेदार वकिलांनी या केसचे काम पहावे असे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आरोपीस फक्त आणि फक्त फाशीचीच शिक्षा होईल असा पाठपुरावा करण्याचे आश्वासन सोनवणे कुटुंबीयांना दिले.

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेच्या आरोपीला शोधून काढल्याबद्दल त्यांचे कौतुक यावेळी केले.

याप्रसंगी तहसीलदार सिद्धार्थ मोरे,डीवायएसपी समीरसिंग साळवे तसेच एपीआय गीते साहेब, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल उपस्थित होते. सोबतच तालुका प्रमुख साईनाथ गिडगे,शहरप्रमुख मयूर बोरसे,जेष्ठ नेते राजाभाऊ भाबड,जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे,आमीन पटेल,राकेश ललवाणी,महीला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख उज्वलाताई खाडे,तालुका प्रमुख विद्याताई जगताप,शहरप्रमुख संगीताताई बागुल,पूजा छाजेड,वंदना शिंदे,राधाबाई मोरे,सुभाष माळवतकर,दिनेश घुगे,गुलाब जाधव,काळू माळी, गोकुळ परदेसी,लाला नागरे,आप्पा आंधळे,दादा घूगे, लोकेश साबळे,मुकुंद झाल्टे,मिलींद पाथरकर,अज्जू शेख,सिध्दार्थ छाजेड,अजिंक्य साळी,सचिन दरगुडे, आनंद दरगुडे,ललीत रसाळ आणि शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *