वेगवान नाशिक
सध्या महाराष्ट्रातील बॅंक या ग्राहकांना अनेक नवनवीन सुविधांचा लाभ देताना दिसत आहे. त्यात एसबीआय या बॅंक आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देत असून या बॅंकेने आता ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आणली आहे. तर आम्ही तुम्हाला या बॅंकेच्या एका स्कीमबाबत सांगत आहोत. चला तर जाणून घेऊया SBI ची काय स्कीम आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा
या योजनेत बॅंक तुम्हाला दरमहा कमाई करुन देणार आहे. म्हणजे या सरकारी योजनेत तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतील. यानंतर, तुम्हाला दरमहा व्याजासह हमी उत्पन्न मिळत राहील. त्यामुळे SBI ची वार्षिकी ठेव योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर, जाणून घ्या
एसबीआयच्या वेबसाइटनुसार, या योजनेतील व्याजदर बचत खात्यापेक्षा जास्त आहे. या योजनेत ठेवीवर तेच व्याज मिळते, जे बँकेच्या मुदत ठेवीवर म्हणजेच FD वर मिळते. यामध्ये युनिव्हर्सल पासबुकही ग्राहकांना दिले जाते. या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी ठेवी ठेवता येतात. ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. तसेच यामध्ये कमाल ठेवीची मर्यादा नसून मासिक वार्षिकीनुसार किमान ठेव किमान 1000 रुपये करावी लागेल.
हायकोर्टाचा शिंदे फडणवीस सरकारला मोठा धक्का
या योजनेत, तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला वार्षिक रक्कम भरावी लागेल. तुमची अॅन्युइटी कोणत्याही महिन्याच्या 29, 30 किंवा 31 तारखेला असेल, तर तुम्हाला पुढील महिन्याच्या 1 तारखेला हे पैसे मिळतील. स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, या सरकारी योजनेत तुम्हाला बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळते. यामध्ये ग्राहकांना एफडी आणि मुदत ठेवीच्या समान व्याजाचा लाभ मिळतो.
अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता