संजय राऊतांचा सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांना सवाल, म्हणाले..


वेगवान नाशिक

नाशिक : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद सुरू असून संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सरकारवर टिकास्त्र सोडले असून चुल्लू भर पाणी में डूब जाना चाहियें असं म्हटलं असून तीन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष सोडून क्रांती घडवणार्‍या शिंदे सरकारचा  खरपूस समाचा घेतला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा

तसेच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अवमान हा संपूर्ण राज्याचा अपमान नाही का? यावरुन भाजपच्या विचारांचा फरक आपल्याला दिसून येतो. छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्‍या सरकारचा बदला घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

त्याचप्रमाणे शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार, खासदारांना त्यांचे मुले, पत्नी आणि नातेवाईक गद्दारच म्हणतील. या नेत्यांची, आमदारांची सुरक्षा काढली तर खवळलेली जनता त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही, असा देखील इशारा खासदार राऊत यांनी दिला आहे.

टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू वनडे मालिकेतून जाणार बाहेर

त्यानंतर नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांचा चेहरा नसताना आम्ही त्यांना उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले. आता त्यांनी स्वत:ची राजकीय कबर खोदली असून, त्यांचे राजकीय करिअर संपले आहे, असा थेट आरोपच खासदार राऊत यांनी केला आहे.

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला मिळतील 27.60 लाख रुपये

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *