वेगवान नाशिक
मुंबईः सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असून भाजपाचे नेतेमंडळी टीका करताना दिसतात. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विचारधारेमुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला की काय, असेही अनेकदा भाजपाकडून टोले लगावण्यात आले.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा
मात्र, हिंदुत्वाची भूमिका घेऊन अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारणा केली आहे. त्यावेळी स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि दुसरीकडे भाजपचा एक आमदार हिंदुच्या मंदिराची जमीन लाटतो असा दोगलेपणा, दुटप्पीपणा फक्त भाजपाच करु शकते, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
हायकोर्टाचा शिंदे फडणवीस सरकारला मोठा धक्का
तसेच भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर हिंदूच्या मंदिराची जमीन लाटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर भाजपच्या खोट्या हिंदूत्वावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले भाजपा-शिंदेसरकार हे स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणते आणि त्याच सरकारमधील भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर मंदिराची जमीन लाटण्याचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल झाला आहे, असेही तापसे म्हणाले आहे.
अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता