मालेगावः तालुक्यात एका शेतक-याचा विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न


वेगवान नाशिक

मालेगावः तालुक्यात एका शेतक-याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा  प्रकार उघड झाला आहे. गणेश गंजीधर कचवे रा. दहिदी असे या शेतक-याचे नाव आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यात गेल्या २८ दिवसांपासून बोरी आंबेदरी धरणावर दहिदीसह चार गावातील शेतकरी कुटुंबासह धरणे आंदोलन करत असून पाठ कालवा बंद करून जलवाहिनी टाकण्याची योजना बंद करावी व पूर्वीप्रमाणेच पाठ कालव्याद्वारे पाणी द्यावे अशी मागणी करत आहे.

संजय राऊतांचा सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांना सवाल, म्हणाले..

मात्र या आंदोलनाची दखल कुठलेही लोकप्रतिनिधी व अधिकारी घेत नसून उलट पाठ कालवा बंद करून जलवाहिनी टाकलीच जाईल अशी दमबाजी करत असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांमधील वैफल्यग्रस्त झालेल्या गणेश कचवे यांनी विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

त्यानंतर ग्रामस्थांनी कचवे यांना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून विषप्राशन केल्याचा व्हिडिओ स्वत: कचवे यांनी काढत व्हायरल केला आहे.

टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू वनडे मालिकेतून जाणार बाहेर

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *