वेगवान नाशिक
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई पाहायला मिळाली आहे. त्यात तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केला नाही. परंतु तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या OPEC+ ची उद्याच बैठक होणार असून या दरम्यान, पुढील महिन्यासाठी म्हणजेच जानेवारी २०२३ साठी उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले जाईल. त्यामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे.
ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – देवेंद्र फडणवीस
यापूर्वी कंपन्यांनी ६ एप्रिल २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ८०-८० पैशांनी शेवटची वाढ केली होती. त्यानंतर आजचे दर पाहता मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. तसेच गंगानगरमध्ये पेट्रोल ११३.४८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९८.२४ रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल ११२.५४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९७.३९ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
12वी पाससाठी नोकरीची संधी, विविध पदांवर एवढे हजाराहून अधिक पदांची भरती
याशिवाय सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये उपलब्ध आहे, जिथे पेट्रोलची किंमत ८४.१० रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ७९.७४ रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक शहरात इंधनाचे दर आजही १०० रुपयांचे वरच राहिले आहेत.
तुमच्या शहराताल पेट्रोल आणि डिझेलचे दर
अहमदनगर- पेट्रोल रु. १०६.२४ प्रति लिटर डिझेल रु. ९२.७७, औरंगाबाद पेट्रोल रु. १०६.२६ प्रति लिटर डिझेल रु. ९२.७७,
धुळे पेट्रोल रु. १०६.०४ प्रति लिटर डिझेल रु. ९२.५७, कोल्हापूर पेट्रोल रु. १०६.७३ प्रति लिटर डिझेल रु. ९३.२५, मुंबई शहर पेट्रोल रु. १०६.३१ प्रति लिटर डिझेल रु. ९४.२७, नाशिक पेट्रोल रु. १०६.०६ प्रति लिटर डिझेल रु. ९२.५८, पुणे पेट्रोल रु. १०६.६७ प्रति लिटर डिझेल रु. ९३.१६, ठाणे पेट्रोल रु. १०५.८६ प्रति लिटर डिझेल रु. ९२.३६ याप्रमाणे आहेत.
टाटा समूहाच्या या स्टॅाकने गुंतवणूकदारांना दिला जबरदस्त परतावा