वेगवान नाशिक
नाशिकः काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षाच्या बालकाच्या खूनामुळे परवानगीविना सुरू असलेली अनाथालयांच्या सुरक्षितेतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याबाबत सुरू असलेल्या बेकायदेशीर आधाराश्रमांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांनी दिले आहेत. तसेच या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर आधाराश्रमांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा
दरम्यान मागील काही दिवसाआधी त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थमध्ये आलोक शिंगारे (चार, उल्हासनगर, कल्याण) या बालकाच्या खूनाची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला ताब्यात घेतले आहे. परंतु याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी पोलीस व महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून त्यात अनेक संस्था परवानगी न घेता अनाथालय चालवत असल्याच्या तक्रारी आहेत.
तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर, जाणून घ्या
त्यामुळे अधिकृत व अनधिकृत संस्थांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले असून विना परवानगी आधाराश्रम चालविणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला मिळतील 27.60 लाख रुपये