वेगवान नाशिक
मुंबई: शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी ठाकरे गटाशी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर हळूहळू अनेक आमदार खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना फुटत चालली होती. मात्र अशातच आता ठाकरे गटात एक एक करून संख्या वाढत असून वेगवेगळ्या विचारांची माणसं येत असल्यामुळे शिवसेना होती त्यापेक्षा अधिक मजबूत होत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा
तसेच संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज मातोश्री निवासस्थानी येऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते अनंत गिते आणि खासदार अरविंद सावंत हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधले.
अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
त्यानंतर उद्धव ठाकरे हे मिडियाशी बोलताना म्हणाले शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली असून अनंत गिते आणि अरविंद सावंत हे जुने नेते असून जाणते आहेत. जाणते म्हटल्यावर या परिस्थितीत काय केलं पाहिजे हे त्यांना माहीत असतं, असं त्यांनी सांगितलं.
आजचा अनिल राठोड यांचा पक्षप्रवेश हा प्रातिनिधीक स्वरुपाचा प्रवेश आहे. आता हे पदाधिकारी राज्यभर जातील. वातावरण निर्मितीपेक्षा वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला याच्यापुढे आळा बसेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
हायकोर्टाचा शिंदे फडणवीस सरकारला मोठा धक्का