Nashik शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच, अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास


वेगवान नाशिक

नाशिक : शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून सातत्याने घरफोडीच्या घटना घडताना दिसत आहे. अशातच शहरातील वेगवेगळ्या भागात दोन घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या असून अडीच लाखांच्या मुद्देमाल चोरून नेला असल्याचं समोर आलं आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा

मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव शिवारात म्हाडा सोसायटीत राहणारे सुनीता भास्कर सोनवणे (रा. न्यू इंग्लिश शाळेजवळ) दि.१ रोजी कामानिमित्त घराबाहेर पडले असता, चोरट्यांनी बंद घर तोडून तीन हजाराची रोकड व सोन्या- चांदीचे दागिणे असा सुमारे एक लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर, जाणून घ्या

तसेच दुसरी घटना सातपूर येथील महादेववाडी परिसरात घडली असून विजया जिभाऊ धिवरे (रा. मराठी शाळेमागे) हे कुटुंबीयांसह सायंकाळच्या सुमारास काहीतरी कामानिमित्त घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ७१ हजार रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे चोरून नेले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलिस अधिक तपास  तपास करत आहेत.

शिवरायांवरील वक्तव्यावरून शिवसेनेचा मोदी आणि भाजपावर हल्लाबोल

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *