ब्रेकिंग! राज्यपालांविरोधात पाठवण्यात आलेल्या त्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल


वेगवान नाशिक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारं वादग्रस्त विधान केल्याने खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापले असून त्यांनी  राज्यपालांना हटवण्याची मागणी करणारं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलं होतं. यानंतर आता राष्ट्रपतींनीं याप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी पाठवलेल्या एका पत्राची दखल घेतली असून  कोश्यारी यांच्या विधानाची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा

दरम्यान उदयनराजे यांनी  राष्ट्रपतींना यासंदर्भात पत्र लिहीले होते. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहविभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवल असून  राष्ट्रपती कार्यालयाने  त्याबाबतची माहिती उदयनराजेंना कळवली आहे.

हायकोर्टाचा शिंदे फडणवीस सरकारला मोठा धक्का

याबाबत  उदयनराजेंनी 23 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे राज्यपाल वक्तव्याच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती राजेंनी राष्ट्रपतींना केली होती. या पत्राची दखल घेत राष्ट्रपतींच्या त्यावरच्या अभिप्रायासह केंद्रीय गृहखात्याकडे पाठवण्यात आल आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारींवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *