वेगवान नाशिक
मुंबईः गेल्या काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं असून ते पुन्हा आता डोक वर काढणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी राजकीय क्षेत्रात जरा जपून रहा
दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सी- समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांच्यासह ७५ जणांना क्लिनचीट देण्यात आली होती. मात्र आता सत्तांतरात बदल झालेल्या सरकारमुळे तक्रारदार माणिकराव जाधव यांनी सी-समरी रिपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे.
या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला मिळतील 27.60 लाख रुपये
याबाबत तक्रारदार माणिकराव जाधव यांच्या वतीने रितसर अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला असून शालिनीताई पाटील आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीने तक्रार अर्ज आज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू वनडे मालिकेतून जाणार बाहेर