पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद,आरोपीला केले 2 तासात जेरबंद,केला खुनाचा उलगडा


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव –

काल आढळून आलेल्या लोकेश सोनवणे याच्या मृतदेहाच्या तपासानंतर पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.उपलब्ध सीसीटिव्ही तपासणी केली असता अपहरण झालेल्या मुलाचे एका संशयीत इसमासोबतचे फुटेज मिळुन आले.

प्रथमदर्शनी सदर बालकाचा खुन झाल्याचे निदर्शनास आले.त्यानुसार तात्काळ अनिकेत भारती,अप्पर पोलीस अधिक्षक,मालेगांव यांना कळविले असता ते घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे डॉगस्कॉड,फिंगरप्रिन्ट व फॉरेन्सिक एक्सपर्ट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

सीसीटिव्ही फुटेजमध्ये अपहरण झालेला मुलगा ज्या व्यक्तीसोबत जातांना दिसत होता,त्याचा शोध घेणेकामी तात्काळ पथके तयार करुन रवाना करण्यात आले.सदर इसमास अवघ्या दोन तासात पकडुन ताब्यात घेण्यात आले.

सदर इसमास विचारपुस केली असता त्याने त्याचे नांव सोन्या उर्फ राहुल उत्तम पवार,वय वर्षे 19,राहणार नेहरूभवनजवळ,मनमाड असे असल्याचे सांगितले.तो अपहरण व मयत झालेला बालक लोकेश सोनवणे याचे घराजवळ राहात असल्याचे निष्पन्न झाले.

सदर युवकाकडे अधिक चौकशी केली असता सदर युवकाने त्याच्या लैंगिक भावना जागृत झाल्याने त्याने अनैसर्गिक संभोग करण्याचे उद्देशाने अल्पवयीन बालकाचे अपहरण करुन,त्यास रेल्वे बंधारा येथे आंघोळ करण्याचे बहाण्याने घेवुन जावुन त्याचेसोबत दोन वेळा अनैसर्गिक संभोग केला.मात्र मुलगा रडू लागल्याने व तो घरी जावुन घडलेला प्रकार सांगेल या भितीने त्याने मुलाच्या डोक्यात दगड मारुन व त्याचा उजवा हात हेक्सा ब्लेडने कापुन त्याचा निर्घृण खुन केला असल्याची कबुली दिली.

सदर गुन्याचा तपास कामी शहाजी उमाप,पोलीस अधिक्षक,नाशिक ग्रामीण,अनिकेत भारती,अप्पर पोलीस अधिक्षक,मालेगांव,समिरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी,मनमाड विभाग, मनमाड यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नि गिते,पो.उप.नि सरोवर, पो.हवा.सुनिल पवार,पो.हवा.संदिप वणवे,पो.ना.गणेश नरोटे,पो.ना.मुदस्सर शेख,पो.शि.गौरव गांगुर्डे, पो.शि.रणजित चव्हाण,पो.शि.राजेन्द्र खैरनार, पो.शि.संदिप झाल्टे,चालक मुरलीधर बुवा,चंदु मांजरे यांनी कार्यवाही केली.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *