राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या तारखेपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली होणार सुरू


वेगवान नाशिक

मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दरम्यानकेंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

राज्यात एवढ्या हजार पदांसाठी होणार तलाठी भरती

तसेच  मुख्यमंत्र्यांनी श्री. श्रीनिवास यांचे स्वागत करुन प्रशासकीय सुधारणांच्या क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. राज्यात सुप्रशासनविषयक मार्गदर्शिका तयार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना देतानाच देशात सुप्रशासन निर्देशांकात द्वितीय क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.

 राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईलशिवाय कामकाज संपूर्णपणे कागदविरहीत होणार असल्याने अधिक सुलभता येणार आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून राज्याच्या सर्व कार्यालयांमध्ये ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सर्व कार्यालये ई-ऑफिस’ वापरू लागले की मोबाईलवर देखील कामकाजाच्या फाईल्सकागदपत्रे पाहता येतीलत्याला मान्यता देता येणार आहे.

राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

सध्या मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणारी फाईल ८ विविध स्तरांमधून येतेया अधिकच्या स्तरांमुळे संबंधित विषयांच्या फाईल्सवर निर्णय होण्यास विलंब लागतोम्हणून गतिमान कारभारासाठी फाईल्स सादर करण्याचे स्तर कमी करण्याच्या सूचना देतानाच फक्त चार स्तरांवरुनच फाईल मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहे. तसेच ई-सेवा निर्देशांकात देखील महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी जास्तीत-जास्त सेवांची संख्या वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यात सध्या राज्यातील ४५० सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत.

भारतीय रेल्वेने आधार कार्डधारकांसाठी आणलीय हि खास सुविधा

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *