वेगवान नाशिक
शिवसेनेचे संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना पैशांची गुंतवणूक करताना नीट विचार करा
संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी पुन्हा निवडून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले असून काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली, असं होत नसून ४० नेते गेले तरी, पक्ष जमीनीवर आहे असं म्हटलं आहे.
तसेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातले जे खासदार-आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांनी परत निवडून दाखवावे. कारण लोकं शिवसेनेच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय
त्यानंतर पत्रकारांनी दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यातील मदभेदाबाबत विचारले असता, “मी खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगलं कळतं. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल”, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शासनाकडून नॅनो युरियाची विक्री वाढविण्याचे निर्देश