वेगवान नाशिक
मुंबई: राज्यात सध्या घडामोडींमध्ये चांगलाच गदारोळ दिसत असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं, असा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना पैशांची गुंतवणूक करताना नीट विचार करा
त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी समाचार घेतला असून राज ठाकरे यांचा आरोप धांदात खोटा असून बिनबुडाचा आहे. एखाद्या माणसानं इतकंही दुटप्पी वागू नये,असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या तारखेपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली होणार सुरू
अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे यांनी आरोप करणं ही हस्यास्पद बाब असून त्यात काही देखील तथ्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने असं विधान करणं योग्य नाही. त्यामुळे शरद पवारांच्या राजकारणावर कुणालाही असं बोलण्याचा हक्क नाही म्हणत अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Gold Price Today सोने- चांदीच्या भावात वाढ