वेगवान नाशिक
राज्यातील वातावरण चांगलेच चिघळले असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यात राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज पुण्यात काही राजकीय पक्षांनी निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची तीन पुस्तके भेट दिली.
टाटा समूहाच्या या स्टॅाकने गुंतवणूकदारांना दिला जबरदस्त परतावा
त्यादरम्यान राज्यपालांनी पश्चात्ताप व्यक्त करत माझ्याकडून अवधनाने चूक झाली आहे, महाराष्ट्राला समजून घेण्यात मी कमी पडतोय “, असं राज्यपालांनी शिष्टमंडळासमोर म्हटल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
परंतु राज्यपालांची झालेली भेट आणि त्यांनी व्यक्त केलेली भूमिका यामुळे आमचे समाधान झाले नसून जोपर्यंत ते माध्यमांसमोर, जनतेसमोर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधातले आंदोलन हे सुरुच रहाणार असल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.
ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – देवेंद्र फडणवीस