मालेगावः तालुक्यात व-हाडाच्या बसला भीषण अपघात


वेगवान नाशिक

मालेगावः  तालुक्यात एका व-हाडाच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली असून १५ ते २९ जण गंभीर जखमी झाले तर वृद्धेसह एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना पैशांची गुंतवणूक करताना नीट विचार करा

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील  चिंचवे(गा) येथील संदीप बाळू साळवे यांच्या मुलीचे साक्री येथे लग्न होते. सकाळी  दहा ते अकरा वाजेच्या सुमारास लग्नासाठी वऱ्हाड  साक्री कडे निघाले होते. त्यावेळी चालक दीपक आहिरे यांचे स्कूल बस (क्रमांक एम एच ४१एबी ९८०५) वरील नियंत्रण सुटल्याने भडगावबारीत बस उलटल्याने अपघात झाला आहे. यामध्ये मकुबाई बारकू ह्यालीज(६०) रा. करजगव्हाण व मयुरी विकास बोरसे (१२) रा शिर्डी यांचा मृत्यू झाला तर  १५ ते २९ वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शासनाकडून नॅनो युरियाची विक्री वाढविण्याचे निर्देश

सदर घटनेतील जखमींना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काही गंभीर जखमी असलेल्या वऱ्हाडींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या अपघातात मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय

 

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *