12वी पाससाठी नोकरीची संधी, विविध पदांवर एवढे हजाराहून अधिक पदांची भरती


वेगवान नाशिक

जर तुम्ही तुमचे 12वी पर्यंत शिक्षण घेतले असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी येत आहे. SSC लवकरच 12वी पाससाठी बंपर भरती करणार आहे. त्याद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये हजारो पदांची भरती केली जाणार आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना पैशांची गुंतवणूक करताना नीट विचार करा

या पदांवर केली जाणार भरती

CHSL परीक्षा आयोजित केली जात असून ज्याद्वारे लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटरची पदे विविध केंद्रीय विभाग आणि मंत्रालयांमध्ये भरली जातात. या वर्षी देखील SSC 6 डिसेंबर 2022 रोजी CHSL परीक्षा 2022 ची अधिसूचना जारी करेल. यापूर्वी, एसएससीने जारी केलेल्या परीक्षा दिनदर्शिकेनुसार, सीएचएसएल परीक्षेची अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी जारी केली जाणार होती. मात्र आयोगाने ३ नोव्हेंबरला नोटीस बजावून आता ६ डिसेंबरला नोटीस येईल, असे सांगितले.

व्हॉट्सअॅपने आणलय शानदार फीचर

या भरती प्रक्रियेद्वारे, SSC सहसा 4 ते 5 हजार पदांची भरती करते.  यंदा भरती परीक्षेअंतर्गत सुमारे ५ हजार रिक्त पदे काढली जाण्याची शक्यता आहे. त्याकरता 12वी उत्तीर्ण उमेदवार एसएससी सीएचएसएल परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत देण्यात आली आहे.

तसेच अर्ज भरण्यासाठी  SSC च्या अधिकृत वेबसाइटवर भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची लिंक सक्रिय केली असून यावर्षीही ६ डिसेंबर रोजी अधिसूचना जारी होताच अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

संजय राऊतांचा शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले..

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *