वेगवान नाशिक
मुंबईः आज सुरुवातीच्या व्यवहारात सोन्या-चांदीचे दर स्थिर राहिले. सोन्या-चांदीच्या दरात फारसा बदल झालेला नाही. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या भावात सकाळी 0.31 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचवेळी, वायदा बाजारात आज चांदीच्या दरात 0.15 टक्क्यांची किंचित वाढ दिसून आली. जागतिक बाजारात सोन्या-चांदीत मजबूती आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना पैशांची गुंतवणूक करताना नीट विचार करा
मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 99 रुपयांनी वाढून 53,337 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तत्पूर्वी, वायदे बाजारातील व्यवहारही याच पातळीवर सुरू होते. दुसरीकडे, चांदीचा दरही आज 100 रुपयांनी वाढून 64,005 रुपये किलो झाला आहे.
राज्यात एवढ्या हजार पदांसाठी होणार तलाठी भरती
आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव दिसून येत असून दोन्हीचे दर खाली आले आहेत. जिथे सोन्याचा दर कालच्या बंद किंमतीपेक्षा ०.२९ टक्के खाली आहे म्हणजे $१,७९७.१३ प्रति औंस, तर चांदीचा दर कालच्या बंद किंमतीपेक्षा ०.४९ टक्के कमी आहे म्हणजे $२२.५९ प्रति औंस.
मुंबई, हैदराबाद, केरळसह काही शहरांमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव काल 49,250 रुपये होता. आदल्या दिवशी किंमत 48,750 होती. म्हणजेच, दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 53,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव आदल्या दिवशी 53,180 होता. त्याचवेळी दिल्ली, मुंबई, दिल्ली आणि लखनऊसह इतर शहरांमध्ये चांदीचा भाव 64,000 रुपये प्रति किलो आहे.
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या तारखेपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली होणार सुरू