वेगवान नाशिक
मुंबईः काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद सुरू आहे. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा केला असून अक्कलकोट आणि सोलापूर हे देखील कर्नाटकचाच भाग असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सीमावाद पुन्हा चर्चेत आल्याने वातावरण चांगलचं तापलं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना पैशांची गुंतवणूक करताना नीट विचार करा
अशातच सीमावादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जत तालुक्याला न्याय मिळवून देणार असून तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा केली आहे.
Gold Price Today सोने- चांदीच्या भावात वाढ
दरम्यान सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्याला पाणी नसल्याने कर्नाटक सरकारने तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्र सरकारला एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊले उचलत जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेतला आहे.
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये या तारखेपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली होणार सुरू