ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – देवेंद्र फडणवीस


वेगवान नाशिक

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीने ऊर्जानवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना पैशांची गुंतवणूक करताना नीट विचार करा

याबाबत एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीचे ग्लोबल बिझनेस डेवलपमेंट विभागाचे प्रमुख मार्सेलो कॅस्टीलो आगुर्तो यांनी आज सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.

 फडणवीस यांनी यावेळी एनेल कंपनीने ऊर्जासह विविध क्षेत्रात केलेली कामेनावीन्यपूर्ण बाबींची माहिती श्री.आगुर्तो यांच्याकडून जाणून घेतली असून इटलीतील ही कंपनी जागतिक पातळीवर नाव असलेली मोठी कंपनी आहे. तसेच वीजनिर्मितीवीजवितरणवीजगळतीवरील उपाययोजना आदींबाबत काय करता येईलयाबाबतही त्यांनी माहिती घेतली.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शासनाकडून नॅनो युरियाची विक्री वाढविण्याचे निर्देश

त्यावेळी राज्यात आपण कशाप्रकारे गुंतवणूक करु इच्छिता याबाबत कंपनीच्यावतीने सविस्तर आराखडा आणि सादरीकरण करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच कमी खर्चिकवीजगळतीचे प्रमाण कमी करणे आणि सध्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे यादृष्टीनेही कंपनीने काम करण्याची राज्य शासनाची अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले आहे.

व्हॉट्सअॅपने आणलय शानदार फीचर


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *