वेगवान नाशिक
गेल्या काही वर्षापासून राज्यात कर विभागात करचोरी सुरू असल्याचं समोर आलं असून देशभरात कर चोरी करणारी हे मोठं रँकेट असल्याचा जीएसटी अधिका-यांना संशय आहे. अशातच राज्य जीसटीच्या हाती 18 कोटींची करचोरीचा तपास करताना घबाडच सापडलं असून 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी विभागानं उघड केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना पैशांची गुंतवणूक करताना नीट विचार करा
या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे. तर जाणून घेऊया की हा प्रकार नेमका काय आहे. शहरातील एक भंगार व्यापा-याच्या 18 कोटींच्या टँक्सची चौकशी सुरु होती. त्यातून संशय आल्यानं याची सखोल चौकशी विभागानं सुरु केली असता संभाजीनगरच्या भंगार कंपनीच्या पत्यावर छापा टाकल्यावर ते गोडाऊन नाही तर एक इमारतीतील फ्लँट असल्याचं उघड झालं.
जतमधील पाणी प्रश्न सोडवण्याबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
दरम्यान फरहत इन्टरप्राईडेस या नावानं हा प्रकार सुरु असून आरोपी फैजल आणि अजिज हे सगळं करत होते. त्यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी 30 आधार कार्ड, पँन कार्ड, 30 वर सीम कार्डस असं आढळून आलं. एवढेच नाही तर त्याच्या लँपटॉपवरून मिळालेल्या प्राथमिक माहितीत त्यांनी 500 कोटींवर बील राज्यात वितरीत केली असून यामधे अनेक बड्या कंपन्यांचा सहभाग असल्याचंही दिसून आलं आहे. त्यामुळे याची व्याप्ती देशभरात असून ती 1 हजार कोटीपेक्षा जास्त जाऊ शकते असा संशय अधिका-यांना आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शासनाकडून नॅनो युरियाची विक्री वाढविण्याचे निर्देश