वेगवान नाशिक
नवी दिल्लीः Vivo आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y35 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन नुकताच TENAA वर दिसला होता, मात्र त्यामध्ये फोनचे नाव उघड करण्यात आले नव्हते. मात्र, त्याच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली होती. आता एक नवीन लीक समोर आला आहे, ज्यामध्ये या फोनचे नाव Vivo Y35 5G असल्याचा दावा करण्यात आला असून कंपनी लवकरच हा फोन लॉन्च करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!
तर कंपनी हा फोन सर्वात आधी चीनमध्ये सादर करेल, त्यानंतर तो इतर मार्केटमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी यासारख्या अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह येईल. Tina लिस्टिंग नुसार, कंपनी Vivo Y35 5G स्मार्टफोन 4 स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. यामध्ये मोठी 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच या फोनचे वजन 186 ग्रॅम असू शकते.
या बँकेकडून कर्ज घेणे होणार महाग
रिपोर्ट्सनुसार, कंपनी फोनमध्ये 6.51-इंचाचा HD+ डिस्प्ले देणार असून हा फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येईल. सध्या फोनमध्ये देण्यात आलेल्या प्रोसेसरबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नसून हा फोन Android 12 वर काम करेल.
फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देणार असून यात 13 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह 2 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हा Vivo फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल.
LPG गॅस सिलिंडरचे दर जाहीर, पहा महाग की स्वस्त?