महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका


वेगवान नाशिक

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्वावरून वाद सुरू आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. सध्या हा वाद न्यायालयात दाखल करण्यात आला असून त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. म्हणूनच संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागून आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!

त्यात या सुनावणीपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आमच्या राज्याची भूमिका अत्यंत स्पष्ट असून महाराष्ट्राचा अर्ज ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद आमच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे आमची बाजू संवैधानिक आणि कायदेशीर आहे, असल्याचं बोम्मईंनी म्हटले आहे.

ब्रेकिंग! शिंदे गटाच्या आमदारांबाबत शिवसेनेच्या या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून बोम्मईंनी केलेल्या दाव्यानंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. त्यांनी म्हटलं की, सत्तेसाठी लाचार झालेलं शिंदे सरकार या भाजपाच्या सरकारकडे जाणूनबुजून कानाडोळा करत असून महाराष्ट्राचे तुकडे पाडायला हे सरकार निघालेलं आहे.

भारतीय रेल्वेने आधार कार्डधारकांसाठी आणलीय हि खास सुविधा

मात्र आजही शिवसेना पूर्वीप्रमाणेच या मुद्द्यांवरुन आघाडीवर लढणार असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आजपासून हे 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *