राज्यात एवढ्या हजार पदांसाठी होणार तलाठी भरती


वेगवान नाशिक

मालेगाव : राज्यात सध्या गेले दोन वर्षे रखडलेल्या  भरत्या  शासनातर्फे  घेण्यात येत आहे. त्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू असून आता अनेक जिल्ह्यांत तलाठी पदे रिक्त असल्याने तलाठी भरती घेण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्यानुसार रिक्त पदांसह नव्याने पुनर्रचित सजा वाढ झाल्याने राज्यात चार हजार १२२ पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याबाबत महत्वाचे अपडेट

दरम्यान  राज्यात १२ हजार ६२६ तलाठी पदे मंजूर झाली असून, त्यातील आठ हजार ५७४ पदे स्थायी आहे तर चार हजार ६२ पदे अस्थायी स्वरूपाची आहेत. आजकाल प्रत्येक व्यक्तीचा तलाठ्याशी संबंध येत असतो. जसे सात-बारा, उत्पन्न, शेतीविषयक दाखले यासाठी नियमितपणे तलाठ्यांच्या संपर्कात राहावे लागते.

आजपासून हे 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम

यामुळे नव्याने तीन हजार ११० पदे भरली जाणार असल्याने तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून, यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

या बँकेकडून कर्ज घेणे होणार महाग

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *