वेगवान नाशिक
राज्यात मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत असलेल्या चित्रपटांबाबत, ऐतिहासिक मुद्यांवरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले असून जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!
तसेच इतिहास अभ्यासकांच्या मते नेसरीतील लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासह सात जण होते की दहा जण होते याबाबतही स्पष्टता नसल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
दरम्यान राज ठाकरे हे पक्ष बैठकांच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहे. त्यात वेडात वीर दौडले सात’मध्ये सात जणांच्या नावाबाबत काही वाद निर्माण झाले होते. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, या वादाच्या अनुषंगाने मध्यंतरी आपण इतिहास अभ्यासक गजानन मेंहदळे यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा जगात कोणत्याही इतिहासाच्या पानात ते सात, आठ की दहा होते, हे नमूद करण्यात आलेले नसल्याचं राज ठाकरे म्हणालेत.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याबाबत महत्वाचे अपडेट
तसेच जातीच्या राजकारणासाठी महाराजांबाबतच्या काही गोष्टी समोर आणल्या जात असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे सुरू असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले शरद पवार हे नेहमी शाहू फुले आंबेडकर हीच नावे घेतात, शिवाजी महाराजांचे यामध्ये नाव घेत नसून इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
ब्रेकिंग! शिंदे गटाच्या आमदारांबाबत शिवसेनेच्या या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट