वेगवान नाशिक
मुंबई: मागील काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यात सध्या महागाईचा दर चढलेला दिसून येत असल्यामुळे सर्वसामान्य लोक या महागाईत होरपळा गेला आहे. मात्र सरकारी तेल कंपन्यांनी डिसेंबर महिन्यातही गॅस सिलिंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना वाढत्या किमतीतून दिलासा मिळाला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!
तसेच सध्या इंधन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे दर जारी केले आहेत.मात्र घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडराच्या दरात कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. तसेच, गेल्या महिन्यात कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 115.50 रुपयांची घट करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून 19 किलो सिलिंडरच्या दरात कपात होताना दिसत होती.
त्यामुळे दोन्ही प्रकारचे सिलिंडर जुन्याच दरांनी मिळणार आहे. त्यात शहरानुसार दिल्लीत 1 डिसेंबर 2022 रोजी येथे घरगुती गॅस सिलिंडरचा दर 1053 रुपये आहे तर कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे.
राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 11 महत्त्वाचे निर्णय
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करतात. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात १ तारखेला बदल होतात. मात्र या महिन्यात दरात बदल झालेले नाहीत. त्यामुळे यंदा कोणतीच कपात वा वाढ करण्यात आलेली नाही.
पोलिस भरतीसाठी अर्ज भरण्याबाबत राज्य सरकारने घेतला हा निर्णय