वेगवान नाशिक
नवी दिल्ली : आधार कार्डधारकांसाठी एक खुशखबर आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आता रेल्वे या प्रवाशांना मोठी सुविधा देत आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्याकरता महत्वाची बातमी आहे. चला जाणून घेऊया काय आहे हि सुविधा.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!
याबाबत आयआरसीटीसीने माहिती दिली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, रेल्वेच्या या सुविधेसाठी तुम्हाला तुमचे केवायसी अपडेट करावे लागेल. यानंतर कन्फर्मेशन लिंकवर क्लिक करून माहिती द्यावी लागून आता तुम्हाला IRCTC वेबसाइटवर लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करावे लागणार आहे.
आजपासून हे 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम
तसेच त्याकरता तुमच्याकडे तुमच्या IRCTC आयडीने लॉग इन करणे आवश्यक आहे. जसे की तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये प्रविष्ट केलेली माहिती, नाव, आधार नंबर आणि व्हर्च्युअल आयडी टाकावा लागेल. त्यानंतर चेक बॉक्समध्ये जाऊन ‘सेन्ड ओटीपी’ निवडावा लागेल. अशी रेल्वे मंत्रालयानेही ट्विट करून माहिती दिली आहे.
या बँकेकडून कर्ज घेणे होणार महाग
दरम्यान प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन रेल्वे 24 तिकिटे बुक करण्याची सुविधा देत असून यूजर आयडी आधारशी लिंक असेल, तर एका महिन्यात तिकीट बुक करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. जर आधार लिंक नसेल तर तुम्ही फक्त 12 तिकिटे बुक करू शकता. म्हणूनच IRCTC ने सांगितले आहे की जर तुमचे आधार कार्ड देखील IRCTC शी लिंक असेल तर तुम्हाला दर महिन्याला 24 आरक्षित तिकिटे बुक करण्याची सुविधा मिळेल.
LPG गॅस सिलिंडरचे दर जाहीर, पहा महाग की स्वस्त?