वेगवान नाशिक
मुंबई: सध्या राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार धावपळ करताना दिसत आहेत. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन अर्ज भरण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!
यू.पी. एस.मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पम त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीने २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सादर करता येतील.
या बँकेकडून कर्ज घेणे होणार महाग
अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे, मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी परवानगी द्यावी असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील राज्य निवडणूक आयोगाला लिहलं होते. त्यामुळे अखेर निवडणूक आयोगानं ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे.
LPG गॅस सिलिंडरचे दर जाहीर, पहा महाग की स्वस्त?