इगतपुरीः तालुक्यात भात शेतीचा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी आक्रमक


वेगवान नाशिक

घोटी : गेल्या दोन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा प्रति क्विंटल ७०० रुपयांचा बोनसही मागील सरकारने बंद केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात इगतपुरी तालुक्यात भाताची आवक वाढल्याने तांदळाचे भाव अचानक खाली आले असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!

याबाबत तालुक्यात भाताला आधारभूत प्रतिक्विंटल साडे चार हजार रुपये भाव द्यावा व एकाधिकार भात खरेदी योजना तत्काळ सुरू करावी, अशी मागणी भात उत्पादकांनी केली आहे. मात्र, या परिस्थितीबाबत प्रशासकीय यंत्रणांनी तोंडावर बोट ठेवल्याने शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या बँकेकडून कर्ज घेणे होणार महाग

तसेच  वर्षभर सुरू असलेल्या निसर्गाच्या कोपामुळे सध्या भात शेती अडचणीत सापडली असून  भाताची बाजारातील आवक वाढताच भात खरेदीदार व्यापाऱ्यांनी दर घटविल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. म्हणूनच गत वर्षी शासनाने घोषित केलेले अनुदान तत्काळ देऊन पुन्हा एकाधिकार खरेदी योजना सुरू करण्याची मागणी शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधींनी  केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याबाबत महत्वाचे अपडेट

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *