वेगवान नाशिक
चांदवडः मुंबई-आग्रा हायवेवर वडाळीभोई शिवारात हॅाटेल हायवे विसावासमोर एसटी बसची हायवा ट्रकवर धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली असून २१ प्रवासी जखमी झाले आहे. याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बस ड्रायव्हर वाल्मिक पंढरीनाथ साठे नांदगाव डेपो यांच्या विरोधात फिर्यादी बस वाहक ज्ञानेश्वर नारायण घुगे यांनी फिर्याद दिल्यानुसार आरोपी बस ड्रायव्हर याने आपल्या ताब्यातील बस (क्र. एमएच ०४ एन ९४१८) ही नाशिक ते चांदवड जाणा-या बाजूने हॅाटेल विसावा समोरून चालवून घेऊन जात असताना एसटी ड्रायव्हरने अविचाराने व हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरून चालणा-या हायवा ट्रक (नं माहित नसलेल्या) हिस पाठीमागून जोरदार ठोस मारून २१ प्रवाशांसह वाहकाच्या दुखापतीस कारणीभूत झाला आहे.
आजपासून हे 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम
याबाबत आरोपी साठे याच्यावर वडनेर भैरव पोलिस स्टेशनात गुन्हा नं २१८, आब्लिक २०२२, भादवि कलम २७९, ३३७, ४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक व्हि. एन घुमरे करीत आहेत.
या बँकेकडून कर्ज घेणे होणार महाग