Nashik सिडको परिसरात एका मुलाचे अपहरण, अंबड पोलिसात गुन्हा दाखल


वेगवान नाशिक

नाशिकः सावतानगर सिडको परिसरात एका मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अंबड पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!

मिळालेल्या माहितीनुसार, कालभैरव चौक हिरे शाळेसमोर सावतानगर सिडको नाशिक याठिकाणी अनिकेत ज्ञानेश्वर सुर्यवंशी हा नेहमीप्रमाणे कॅालेजला जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेला तो अद्यापावेतो घरी परत आला नाही. म्हणून कुटुंबियांनी   त्याचा आजूबाजूच्या परिसरात नाशिक शहरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

म्हणून भानुदास गोविंद वाघमारे यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे. त्यानंतर अज्ञाताविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याबाबत महत्वाचे अपडेट

याबाबत वरिष्ठ पोलिस निरिक्षक देशमुख, पोलिस उपनिरिक्षक सोनवणे, पो. उपनि. शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देत अधिक माहिती जाणून घेतली असून याबाबत पो. उप.नि. शेवाळे अधिक तपास करत आहे.

आजपासून हे 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *