नवाब मलिकांना मोठा धक्का, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला


वेगवान नाशिक

मुंबईः माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांचा जामीन नाकारला असून  न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता!

दरम्यान मलिकांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने १४ नोव्हेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला असून मलिकांचा जामीन नाकारण्यात येऊन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे नवाब मलिकांना मोठा धक्का बसला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याबाबत महत्वाचे अपडेट

ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत असून, सध्या त्यांच्यावर एका  खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.                                                                                    तर नवाब मलिक यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात आपल्यावर खटला चालवण्यासाठी कोणताही गंभीर गुन्हा नसल्याचा युक्तिवाद करत जामीनासाठी विनंती केली होती. मात्र, नवाब मलिक यांनी कोणताही पुरावा नसल्याचा दावा केला असल्याने राष्ट्रीय तपास संस्थेने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या आधारे तपास यंत्रणेने जामिनाला विरोध केला आहे.

ब्रेकिंग! शिंदे गटाच्या आमदारांबाबत शिवसेनेच्या या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *