वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,अविनाश पारखे
मनमाड,नांदगाव-
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (इंडियन हायस्कूल) मनमाडच्या आज पार पडलेल्या शताब्दी महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणुन माजी लोकसभा सभापती सन्मा. सुमित्राताई महाजन या उपस्थित होत्या.तालुक्याचे आमदार म्हणुन सुहास कांदे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार सुहास कांदे यांनी शाळेचे संचालक मंडळ,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व माजी विद्यार्थी सर्वांना शताब्दी महोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे,ज्येष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे,वाल्मीक आप्पा आंधळे, महावीर ललवाणी,उपजिल्हाप्रमुख नितीन सानप, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले,असिफ शेख, वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक पिंटू वाघ,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, मनमाड शहरप्रमुख संगीताताई बागुल,अमीन पटेल, दादा घुगे,मुकुंद झाल्टे,लोकेश साबळे,अज्जू शेख, लाला नागरे,करण बहोत,केतन जाधव,सचिन दरगुडे, कुणाल विसापुरकर आदिंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.