वेगवान नाशिक
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने राज्यात थैमान घातले होते. कित्येक जणांना कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पण यावर्षी कोरोनाचं संकट कमी झाल्याने नागरिकांना दिलासा वाटला. मात्र, त्यातच आता आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले असून या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला आहे.
आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!
दरम्यान विविध देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका बळावत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून एक लक्ष वेधणारं ट्विट करत त्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती देण्यात आली असून WHO कडून Monkeypox चं नवं नाव नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये सदरील आजारासाठीच्या नव्या नावावरूनही पडदा उचलत त्यामागील कारणंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच यापुढे मंकीपॉक्सचं नाव असणार एमपॉक्स’ आहे.
छगन भुजबळांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता
त्यातच यंदाच्या वर्षी ज्यावेळी मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळालं, त्यावेळी अनेकांनीच वर्ण, जात, पंथ या मुद्द्यांवरुन आक्षेपार्ह वक्तव्य करत हिणवलं गेलं. WHO पर्यंत या सर्व गोष्टी पोहोचल्या आणि यानंतर चिंता व्यक्त करत या आजाराचं नाव बदलण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं घेतला.
Gold Price Today सोने खरेदी करण्यापूर्वी आजचे दर तपासा
तसेच सध्या जगभरात विविध ठिकाणी एमपॉक्सचे रुग्ण आढळले असल्याने त्यात विविध लक्षणं असणाऱ्या या आजारामध्ये काहींना शरीरावर बारीक पुरळ, ताप, थंडी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणं दिसली होती. तर संपूर्ण जगात आतापर्यंत 80 हजारांहून अधिक रुग्णांना या आजारानं विळख्यात घेतलं असून, 55 जणांचा यात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
या कंपनीच्या कर्मचार्यांची केली जाणार कपात, कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम