वेगवान नाशिक
मुंबईः गेल्या काही वर्षापासून रखडलेली पोलीस भरती अखेर आता होणार असून राज्यात १८ हजार जागांसाठी भरती होणार आहे. तर गेल्या काही दिवसापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख होती, पण वेबसाईट मध्येच हँग होत असल्या कारणामुळे अर्ज करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यभरातून मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. या संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!
या निर्णयात पोलीस भरतीसाठी आता १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करुन सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच दर मंत्रिमंडळ बैठकीत ७५ हजार पद भरतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचही फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता ज्या उमेदवारांना पोलीस भरतीसाठी अर्ज भरताना अडचणी येत आहेत, त्यांना अर्ज भरता येणार आहे.
शिवसेनेच्या नावावर व चिन्हाबाबत या तारखेला सुनावणी
तसेच नॉनक्रिमिलिअरसाठी काही तक्रारी आल्या होत्या, त्यावरही पर्याय काढला असून भूकंपग्रस्ताचाही यात समावेश करण्यात आला आहे. त्यात आतापर्यंत ११ लाख ८० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
या कंपनीच्या कर्मचार्यांची केली जाणार कपात, कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम