वेगवान नाशिक
सध्या राज्यात अनेक तरूण रोजगारावाचून वंचित आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तरूणांसाठी चांगली बातमी आणली आहे. तर केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये देशातील १० लाख तरूणांना नोकरी मिळणार आहे. याबाबत पीएस मोदी यांनी 22 ऑक्टोबर रोजी पीएम रोजगार मेळावा सुरू केला होता.
आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!
त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी 75000 तरुणांना नियुक्तीपत्रे देऊन त्याची सुरुवात केली असून सीआयएसएफसह इतर अनेक विभागांमध्ये भरती झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे.
Gold Price Today सोने खरेदी करण्यापूर्वी आजचे दर तपासा
याबाबत मोदींनी सर्व मंत्रालये आणि विभागांना सूचना दिल्या आहेत. रोजगार मेळाव्याद्वारे 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये भरती केली जात आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, प्राप्तिकर विभागासह विविध विभागांमध्ये ही भरती सुरू आहे.
रिपोर्टनुसार, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 2023 च्या अखेरीस गट अ श्रेणीतील एकूण 2386, गट ब मधील 25836 आणि गट क मधील 7.6 लाख रिक्त जागा भरल्या जातील. तर विविध शासकीय विभागांतर्गत एकूण 10 लाख पदे एकत्रितपणे भरण्यात येणार आहेत.
माझ्यावर हल्ला करण्याचा कट संजय राऊतांचा दावा