सिन्नरः तालुक्यात महिलेला मारहाण करत 52 हजारांचा ऐवज लंपास


वेगवान नाशिक

सिन्नरः तालुक्यात मागील आठवड्यात वडगाव पिंगळा येथे 8 जणांनी सायंकाळच्या सुमारास घरात शिरून आई मुलास बांधून ठेवत ऐवज लंपास केला असल्याची घटना घडली होती. त्यातच पुन्हा आता भोकणी येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरात शिरत महिलेला मारहाण करत  दागिने व रोकड लंपास केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भोकणी-खंबाळे रस्त्यालगत प्राजक्ता गणेश साबळे (20) या आपल्या कुटुंबासोबत राहतात. दि. २७ रोजी सायंकाळपर्यंत प्राजक्ता व त्यांची सासू घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात काम करत असून त्या चार वाजेच्या सुमारास  घरी आल्या त्यावेळी साडे सहा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश करत प्राजक्तास मारहाण करून एकाने तिला तोंड दाबून घराच्या बाहेर आणून बसवले.

नाशिकच्या अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

तर दुसऱ्या चोरट्याने घरातील कपाट व इतर सामान चाचपडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख 30 हजाराची रक्कम असा सुमारे 52 हजारांचा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला. त्यानंतर त्यांनी मिळालेला मुद्देमाल घेऊन प्राजक्ताच्या पोटात जोराची लाथ मारून  तेथून पोबारा केला.

याबाबत  प्राजक्ताने शेजारच्या वस्तीवर धाव घेत घटना सांगितली असून तिच्या पतीला फोनवरुन कळविण्यात आले. त्यानंतर पतीने वावी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, हवालदार सतीश बैरागी, नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील तरुणांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चोरटे तेथून पळून गेले होते. याबाबत अधिक तपास वावी पोलिस करत आहेत.

Gold Price Today सोने खरेदी करण्यापूर्वी आजचे दर तपासा

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *