सिन्नरः तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 200 कोंबड्या ठार


वेगवान नाशिक

सिन्नरः तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून  काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचं दिसत आहे. वारंवार बिबच्याचा हल्ला झाल्याच्या घटना घडताना दिसत असून अशातच तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी शिवारात बिबट्याने एका कुक्कुटपालन केंद्राची जाळी तोडून २०० कोंबड्या फस्त केल्या असल्याचं समोर आलं आहे.

आजचे राशी भविष्यः आजचा दिवस या राशींना लाभ दायक ठरणार!

याबाबत माहिती अशी की, कासारवाडी येथे वैभव देशमुख यांचे पाच हजार कोंबड्यांचे कुक्कुटपालन केंद्र असून महिनाभरापूर्वीच त्यांनी नवीन कोंबड्या आणल्या होत्या. मात्र दि २७ रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने केंद्राची जाळी तोडून आत प्रवेश केला असून जवळपास २०० कोंबड्यांवर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

Gold Price Today सोने खरेदी करण्यापूर्वी आजचे दर तपासा

याबाबत ग्रामस्थांना माहिती कळताच माजी उपसरपंच सचिन देशमुख यांनी केंद्राला भेट देत पाहणी केली असून त्यांनी वनविभागाला माहिती देत पंचनामा करण्याची मागणी केली. त्यानुसार वनविभागाचे आकाश रुपवते यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.

नाशिकच्या अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

तसेच देशमुखांचे  यामुळे लाखांचे नुकसान झाले असून तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

या कंपनीच्या कर्मचार्‍यांची केली जाणार कपात, कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *